महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

By सदानंद नाईक | Updated: June 11, 2025 21:05 IST2025-06-11T21:03:55+5:302025-06-11T21:05:33+5:30

उल्हासनगर महापालिका सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, कलानी, रिपाई गट यांच्यात चढाओढ लागली आहे. भाजपाला महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कलानी व शिंदे गटाने एकमेकाकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा आहे.

Omi Kalani's hand of friendship with the Shinde group again? In Ulhasnagar municipal elections | महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानी यांनी समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने, राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच भाजप प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात असून महापौर पदासाठी पंचम कलानी प्रमुख दावेदार आहेत.

उल्हासनगर महापालिका सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, कलानी, रिपाई गट यांच्यात चढाओढ लागली आहे. भाजपाला महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कलानी व शिंदे गटाने एकमेकाकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा आहे. ओमी कलानी यांनी निवडक समर्थकासह शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुभेच्छा भेट घेतली. तसेच कलानी शिवाय कोणताच पक्ष महापालिका सत्तेत बसण्याची शक्यता नसल्याने, सर्वच पक्षाला कलानी हवेहवेसे आहेत. मात्र वारंवार पक्ष बदलीचा फटका कलानी यांना बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व नियम धाब्यावर बसून कलानी कुटुंबानी दोस्तीचा हात नावाखाली श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचार केला होता. पंचम कलानी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष असून पप्पू कलानी यांचा ओढाही शरद पवार गटाकडे असल्याची कुजबुज सुरु आहे. दरम्यान ओमी कलानी यांनी निवडक समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने, राजकीय समिकरण बदलण्याची शक्यता आहे. 

ओमी कलानी यांनी शिंदे गटा सोबत युती केल्यास शिवसेना शिंदे गट व कलानी यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. मागील राजकीय इतिहास बघता दोन्ही पक्ष महापौर पद अडडीच अडडीच वर्ष वाटून घेणार असल्याचे बोलले जाते. भाजपाची ताकद मर्यादित असून गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी यांच्यामुळे भाजपाचा महापौर निवडून आला होता. ठाकरे गटाकडे सामान्य शिवसैनिकांचा ओढा असल्याने, काँग्रेस व शरद पवार गटाच्या मदतीने नगरसेवक निवडून येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

 पप्पू कलानीच्या भूमिकेकडे लक्ष 
माजी आमदार व शहराचे आकर्षण असलेले पप्पू कलानी हे महापालिका निवडणुकीत काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले. ओमी कलानी यांच्याकडे पप्पू कलानी यांचीच राजकीय ताकद आहेत. राजकीय पक्षही पप्पू कलानी यांच्या चर्चे विना कोणतेही भूमिका घेणार नाही. असे बोलले जाते. 

भाजपाचा कलानीला विरोध
 आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्यासह अन्य कट्टर भाजप पदाधिकारी कलानी विरोधक आहेत.

Web Title: Omi Kalani's hand of friendship with the Shinde group again? In Ulhasnagar municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.