जुनी उच्चदाब वाहिनी मनोऱ्यांसह हटवली
By अनिकेत घमंडी | Updated: November 24, 2023 17:57 IST2023-11-24T17:56:52+5:302023-11-24T17:57:22+5:30
विद्यालयाच्या मैदानातील एक व कल्याण-बदलापूर रोडवरील एक असे दोन उच्च विद्युत दाबाचे मनोरेही हटवण्यात आले.

जुनी उच्चदाब वाहिनी मनोऱ्यांसह हटवली
डोंबिवली: कल्याण-बदलापूर राज्यमार्गाजवळ महात्मा गांधी विद्यालयाचे प्रांगण तसेच संरक्षण भिंतीलगत रस्त्याच्या कडेला साधारणतः ३५-४० वर्षे जुनी २५ मीटर उंच मनोऱ्यावरील डमी अतिउच्चदाब वाहिनी शुक्रवारी हटवण्यात आली. विद्यालयाच्या मैदानातील एक व कल्याण-बदलापूर रोडवरील एक असे दोन उच्च विद्युत दाबाचे धोकादायक स्थितीतील मनोरेही त्यासोबत हटवण्यात आले.
मध्य रेल्वे व महावितरणद्वारे महात्मा गांधी विद्यालयाच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्यात आले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंधेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर विभाग एकचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, नारायण मार्लेगावकर, अलका कावळे , सतीश कुलकर्णी, भास्कर कोळे, सुनील गायकवाड आदी अधिकारी याशिवाय रेल्वेचे वेद प्रकाश साहू, शैलेंद्र सेठी, अंबरनाथ नगर परिषद, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि नागरिकांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण करण्यात आले.