शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे रक्तदान शिबीरांसह औषद वाटप अन् रोजगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 15:59 IST2020-12-10T15:58:39+5:302020-12-10T15:59:20+5:30
शरद पवार यांच्या वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला १२ डिसेंबर रोजी होणार आहे.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे रक्तदान शिबीरांसह औषद वाटप अन् रोजगार मेळावा
कल्याण- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे. कल्याणमध्ये ३०० बाटल्या रक्त गोळा करण्यात येणार आहे. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी हा आरोग्यदायी उपक्रम घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला १२ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात करण्यात येणार आहे. कल्याणमधील कार्यकत्यांना हा प्रेक्षपण पाहण्याची सुविधा कल्याणच्या वाधवा हॉलमध्ये केली आहे. त्याठिकाणी कल्याणमधील विविध क्षेत्रत कार्य करणा:यांचा सत्कार केला जाणार आहे.
त्याबरोबर राज्यभरात १ लाख गरजूंना मास्क, सॅनिटायझर, सी व्हीटामीनच्या गोळ्य़ा, रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्य़ांचे वाटप केले जाणार आहे. कोरोनामुळे बेराजगारी वाढली आहे. त्यामुळे राज्यभरातील ८० हजार तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे वंडार पाटील, सारीका गायकवाड आणि सुधीर पाटील आदी उपस्थित होते.