शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ आमच्यासोबत राहणार यात शंका नाही; भाजप-मनसे संभाव्य युतीला चव्हाण यांचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 07:53 IST

हिंदुत्वाचा व  विकासाचा अजेंडा राबविला जात असेल तर ते आमच्यासोबत राहणार यात शंका नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: महायुतीच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील हेही आमच्यासोबतच आहेत. त्यांच्या पक्षाचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे, तोच आमचाही आहे. हिंदुत्वाचा व  विकासाचा अजेंडा राबविला जात असेल तर ते आमच्यासोबत राहणार यात शंका नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी केले. 

नवी मुंबई महापालिकेतील दहीसर मोरी या गावात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १४ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. 

चव्हाण पुढे म्हणाले, पाटील यांनी या सर्व विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. लोकसभेपर्यंत ते १०० टक्के आमच्यासोबत राहतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातील असलेले आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. त्यामुळे खासदार शिंदे यांना पुन्हा या मतदारसंघातून हॅट्ट्रिक करून निवडून देणार, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

‘पक्षाचे धोरण राज ठाकरे ठरवतील’ 

‘मी विकासासोबतच आहे. मात्र आमच्या पक्षाचे धोरण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतील,’ असे स्पष्टीकरण आमदार राजू पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर दिले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMNSमनसे