कोरोना काळातील सात कार्यतत्पर महिला अधिकाऱ्यांचा 'निर्भय जर्नालिस्ट फाऊंडेशन'तर्फे सत्कार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:44 PM2021-03-10T13:44:02+5:302021-03-10T13:44:13+5:30

Corona Virus: कोरोना काळात आणि गेल्या वर्षांपासून रात्र न दिवस रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या महापालिकेतील सात महिला अधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला.

Nirbhaya Journalist Foundation felicitates seven hard working women officers in Corona crisis | कोरोना काळातील सात कार्यतत्पर महिला अधिकाऱ्यांचा 'निर्भय जर्नालिस्ट फाऊंडेशन'तर्फे सत्कार  

कोरोना काळातील सात कार्यतत्पर महिला अधिकाऱ्यांचा 'निर्भय जर्नालिस्ट फाऊंडेशन'तर्फे सत्कार  

Next

कल्याण : कोरोना काळात आणि गेल्या वर्षांपासून रात्र न दिवस रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या महापालिकेतील सात महिला अधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान मंगळवारी कल्याण-डोंबिवली जर्नलिस्ट असोसिएशन अंतर्गत नव्याने नोंदणी(रजिस्टर) करण्यात आलेल्या 'निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन" पत्रकार संघातील पत्रकारांमार्फत आयुक्तांच्या हस्ते संपन्न झाला.

जग भरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सुद्धा हळूहळू रौद्ररुप धारण केले असताना साठ हजाराचा आकडा पार केलेल्या रुग्णाना बरे करून घरी सुखरूप पाठविण्यासाठी झटणार्या आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, डॉ .प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी , डाॕ. प्रज्ञा टिके वैद्यकीय अधिकारी ,डाॕ.अनुपमा साळवे  पाटकर आरोग्य केंद्र प्रमुख, डाॕ.सुहासिनी बडेकर ,वैद्यकीय अधिकारी शास्त्रीनगर , सपनाकोळी देवनपल्ली शहर आभियंता व माधवी पोफळे जनसंपर्क अधिकारी  या सात कोरोना काळात अविरत कार्यरत असलेल्या कोविडयोध्यांचा कल्याण डोंबिवलीचे महापालिका आयुक्त डाॕ. विजय सुर्यवंशी यांच्या दालनात कोरोनाचे सर्व नियम पाळून छोटेखानी प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर एक टिमलीडर म्हणून कोरोनाचे आव्हान अत्यंत यशस्वीपणे थोपवून धरणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचाही निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तर कोरोनावर यशस्वीपणे मात करून पुन्हा त्याच जोमाने पत्रकारितेचे आव्हान पेलणाऱ्या झी 24 तासच्या आतिश भोईर, महाराष्ट्र टाइम्सचे स्वप्निल शेजवळ आणि पुढारीचे शुभम साळुंखे यांचाही महापालिका आयुक्तांकडून विशेष गौरव करण्यात आला.याप्रसंगी निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर पगारे, खजिनदार आतिष भोईर, सचिव केतन बेटावदकर यांच्यासह प्रशांत माने, प्रदिप भणगे, मयुरी चव्हाण-काकडे, संजीत वायंगणकर, स्वप्निल शेजवळ, शुभम साळुंखे, प्रथमेश वाघमारे आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: Nirbhaya Journalist Foundation felicitates seven hard working women officers in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.