शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही; जयंत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 20:18 IST

आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल, असे विधान जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.

कल्याण-आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही. आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल असे विधान जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा गेल्या दोन दिवसापासून संवाद दौरा सुरु आहे. आज कल्याणमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते आले होते. 

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार घातला. यावेळी त्यांचे फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मंत्री पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रकरणी मंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, मागच्या काळात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गाजला होता. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रचंड मोठे दुर्लक्ष तत्कालीन सरकारने केले होते. आमच्या सरकारने खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले आहे.

 कलानीसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही..उल्हासनगरात कार्यकर्त्यांची बैठक संपल्यावर माजी आमदार पप्पू कलानी यांनी चहा करीता मला बोलवले होते. त्याठिकाणी चहापानासाठी मी गेलो होते. मात्र कलानी यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचा खुलासा मंत्री व प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केला आहे.

शिवाजी चौकात वाहतूक कोंडी -मंत्री व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या स्वागतासाठी शिवाजी चौकात कार्यकत्र्यानी एकच गर्दी केली होती. यावेळी फटाके फोडण्यात आले. त्यामुळे काही वेळ शिवाजी चौकात वाहतूक कोंडी झाली होती. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस