शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

माझी मुलगी विशालला ‘काका...काका’ म्हणायची; पीडितेच्या पित्याच्या शोकाकुल भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 09:51 IST

मुलीची आई, आजी शोकाकुल आहेत. मुलीची अन्य तीन भावंडे ‘दीदी किधर गई’ असा प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर देऊ, असा सवाल वडिलांनी केला. पीडित मुलीचे वडील हे गाडी चालक आहेत.

कल्याण : माझी अल्पवयीन मुलगी आरोपी विशाल गवळीला ‘काका... काका...’ हाक मारायची. मुलीला विशालकडे पाठवू नका असे शेजाऱ्यापाजाऱ्यांनी सांगितल्याने मुलीला विशालकडे जाण्यापासून मी मज्जाव केला होता; पण ज्याला ती काका म्हणायची त्याने तिचा घात केला, अशा शब्दांत पीडित मुलीच्या पित्याने शोकाकुल अवस्थेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुलीची आई, आजी शोकाकुल आहेत. मुलीची अन्य तीन भावंडे ‘दीदी किधर गई’ असा प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर देऊ, असा सवाल वडिलांनी केला. पीडित मुलीचे वडील हे गाडी चालक आहेत. गाडी चालविण्यातून त्यांना १८ हजार रुपये पगार मिळतो. या कमाईतून ते आई, पत्नी, चार मुलांचा सांभाळ करतात. पीडित मुलगी ही त्यांची मोठी मुलगी होती. ती विशालच्या घरी जायची. गणेशोत्सवात ती त्याच्या घरी गेली होती. शेजाऱ्यांनी सांगितले की, विशालचे चारित्र्य चांगले नाही. तुम्ही मुलीला तिकडे पाठवू नका. आम्ही तिला विशालच्या घरी जाऊ नकोस म्हणून बजावले होते. ती त्याच्या घरी गेल्याचे कळल्यावर मारहाण केली होती. त्यानंतर मुलगी त्याच्या घरी जात नव्हती, असे तिच्या पित्याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट-  पीडित मुलीच्या वडिलांना घेऊन आ. सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. -  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविले जाईल. आरोपीला फाशीची शिक्षा होईल. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाईल. -  पीडित मुलीच्या वडिलांना उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही आर्थिक मदत केली.

‘पुडीत काय आहे याची तिला कल्पना नव्हती’ -  पीडित मुलगी विशालकडे गेली असता विशालच्या वडिलांनी त्या मुलीच्या हाती पुडी टेकवली व ती पुडी इमारतीखाली उभ्या असलेल्या व्यक्तीला देण्यास सांगितले. -   पीडित मुलीने ती पुडी त्या व्यक्तीला नेऊन दिली. मुलीला त्या पुडीत काय आहे याची कल्पना नव्हती, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस