शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खून केला पुण्यात, दोघांच्या हातात कल्याण येथे पडल्या बेड्या; २० मिनिटांतच ताब्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 09:01 IST

राजूकुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी प्रवीण महतो याची हत्या केली.

कल्याण : पुण्यातील हिंजवडी परिसरात नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची हत्या करणारे दोघे जण बिहारला पळून जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. याबाबत पुणे पोलिसांनी मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला. अवघ्या २० मिनिटांतच दोघांना कल्याण स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. राजूकुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी प्रवीण महतो याची हत्या केली.  

बिहारला जाण्याचा प्रयत्न

तपासात प्रवीणचे दोन्ही मारेकरी कल्याणच्या दिशेने गेले आहेत. ते बुधवारी रेल्वेने बिहारला जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे विजय कादबाने यांना या घटनेची माहिती दिली.

मेडिकल स्टोअरमध्ये दिसले

कादबाने यांनी  पोलिस निरीक्षक राम चोपडे,  प्रशांत आंधळे यांचे पथक नेमले. पथक बुधवारी पहाटे  कल्याण स्थानकावर पोहोचले. मारेकऱ्यांचा शाेध घेताना दोन संशयित मेडिकल स्टोअरमध्ये दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांनाही पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रवीणचे अनैतिक संबंध

प्रवीणचे बिहार येथे राहणारा शिक्षक राजूकुमार याच्या पत्नीशी अनैतिक संबंध  असल्याचा संशय होता. या संशयावरून राजू हा धीरजकुमार याला भेटला.

धीरज हा काही महिन्यांपूर्वी प्रवीण काम करीत असलेल्या  नर्सरीतच कामाला होता.

धीरजने राजूकुमार याला बिहारहून बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून प्रवीणचा काटा काढला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस