कल्याणात लॉजमध्ये महिलेची हत्या?
By सचिन सागरे | Updated: December 10, 2023 17:55 IST2023-12-10T17:55:17+5:302023-12-10T17:55:33+5:30
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील एका लॉज मधील रूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली. ज्योती तोरडमल ...

कल्याणात लॉजमध्ये महिलेची हत्या?
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील एका लॉज मधील रूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली. ज्योती तोरडमल असे या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती.
मयत ज्योती काल दुपारच्या सुमारास एका इसमासोबत या लॉजमध्ये आली होती. आज सकाळच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यासोबत असलेला भूपेंद्र गिरी हा पळून गेला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
आज सकाळी बराच वेळ झाला मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉज मधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ज्योतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ महात्मा फुले चौक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ज्योतीच्या सोबत आलेला भूपेंद्र याच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत.