पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून दोन तरुणांनी मिळून एकाची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणातील एकच आरोपी पोलिसांना सापडला होता. पण, दुसरा आरोप फरार झाला होता. काही महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दुसरा आरोपी सिराज शाह याला काल डोंबवलीमधून पोलिसांनी अटक केली. मानपाडा पोलिसांनी त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सिराज हा डोंबिवली एमआयडीसीमध्ये मजूर म्हणून काम करीत होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी येथील डंकुनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी त्यावेळी अटक केली. मात्र, या हत्येत सहभागी असलेला दुसरा आरोपी सिराज शाह हा पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते.
मंदिरातील पुजारी मुलावर करत होता अत्याचार; पत्रकाराने बघितले आणि नंतर...; वाचा Inside Story
पश्चिम बंगाल येथील डंकुनी पोलिसांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांना याची माहिती दिली. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला शोधण्याचे काम सुरु झाले. मानपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. अखेर मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी महेश राळेभात यांच्या पथकाला एक माहिती मिळाली.
तो कामगार सिराज शाह निघाला
डोंबिवली एमआयडीसीत एक मजूर गेल्या दोन महिन्यापासून काम करत आहे. तो पश्चिम बंगालचा आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या मजूराला ताब्यात घेतले. तो मजूर दुसरा कोणी नसून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी सिराज शाह होता. अखेर पोलिसांनी सिराज शाहाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला आत्ता पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.