नगरपालिकेची तयारी, अंबरनाथमध्ये काँग्रेसकडूनही जय श्रीरामची बॅनरबाजी

By पंकज पाटील | Updated: March 30, 2023 17:57 IST2023-03-30T17:57:18+5:302023-03-30T17:57:35+5:30

राम नवमी निमित्त अंबरनाथ शहरांमध्ये ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे

Municipal preparation, Jai Shriram banner battle by Congress in Ambernath | नगरपालिकेची तयारी, अंबरनाथमध्ये काँग्रेसकडूनही जय श्रीरामची बॅनरबाजी

नगरपालिकेची तयारी, अंबरनाथमध्ये काँग्रेसकडूनही जय श्रीरामची बॅनरबाजी

अंबरनाथ - शहरात काँग्रेसने रामनवमी निमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरवर 'एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम.. जय श्रीराम!' अशी उद्घोषणा लिहिण्यात आली आहे. त्यामुळे रामनामाचा नारा देत काँग्रेसनेअंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची सुद्धा तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. 

राम नवमी निमित्त अंबरनाथ शहरांमध्ये ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. काँग्रेसच्या माध्यमातून रामनवमीचे लावण्यात आलेले बॅनरबाजी हे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. अंबरनाथच्या कोहजगावमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना याच गावातील नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने थेट नगराध्यक्ष पदासाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच मोर्चे बांधणीच्या अंतर्गत शहरभर रामनवमीचे बॅनर्स झळकले आहेत
 

Web Title: Municipal preparation, Jai Shriram banner battle by Congress in Ambernath