Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरला अडकली ताडपत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 19:19 IST2022-03-05T19:07:59+5:302022-03-05T19:19:12+5:30
Central Railway And Mumbai Train Update : गेल्या अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक यामुळे प्रभावित झाली आहे. कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प आहे.

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरला अडकली ताडपत्री
ठाणे - मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. गेल्या अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक यामुळे प्रभावित झाली आहे. कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प आहे.
मेल एक्सप्रेसमधून एक ताडपत्री उडून ती ओव्हरहेड वायरला चिकटली असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या (रविवारी) याच मार्गावर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक पाहणी करण्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडली आहे. नक्की या मार्गावर काय अडचणी आहेत याचं हे उदाहरण असल्याचं मत कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केलं आहे.