मोटरसायकल चोर निघाला येरवडा जेलचा फरार बंदी; उल्हासनगर पोलीस ठाण्याची कामगिरी
By सदानंद नाईक | Updated: July 18, 2025 18:27 IST2025-07-18T18:27:29+5:302025-07-18T18:27:29+5:30
आरोपी येरवडा कारागृहातील फरार बंदी असल्याचे उघड झाले.

मोटरसायकल चोर निघाला येरवडा जेलचा फरार बंदी; उल्हासनगर पोलीस ठाण्याची कामगिरी
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील खेमानी परिसरातून गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केलेला मोटारसायकल चोर निघाला. मात्र त्याला बोलते करताच तो चक्क येरवडा कारागृहातील फरार बंदी असल्याचे उघड झाले. उल्हासनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालया पुढे हजर केले असता, त्याला १८ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली. असी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
उल्हासनगर पोलीस चोरीस गेलेल्या एका ऍक्टिव्हा मोटार सायकलचा शोध घेत होते. दरम्यान गुप्त माहितीद्वारे एक्टिव्हा चोरणारा चोर गुरुवारी खेमानी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी मध्यरात्री १ वाजता अनिल मेघदास पटेनिया या गुन्हेगाराला अटक केली. पोलिसांनी त्याला बोलते केले असता, तो उल्हासनगर शेजारील म्हारळगाव येथे राहणारा असल्याची कबुली दिली. तसेच टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या गुन्हात येरवडा कारागृह पुणे येथे जन्मठेपेची शिक्षेत न्यायबंदी असतानां ओपन जेलमधुन पळून आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकाराने पोलिसांना धक्का बसला. त्यांनी त्वरित याबाबत येरवडा पोलीस स्टेशन पुणे येथे संपर्क साधुन खात्री केली असता, त्यांनी येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. असे पोलीस उपायुक्त गोरे म्हणाले.
उल्हासनगर पोलिसांनी अनिल पटेनिया याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला उल्हासनगरातील न्यायालयात हजर केले असता, १८ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)अंकुश म्हस्के आदीनी येरवडा जेल मधून फरार आरोपीला अटक केली.