जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा काढू नये मनसे आमदार राजू पाटील यांचा भाजपला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 20:06 IST2023-09-01T20:05:44+5:302023-09-01T20:06:20+5:30
आमदार पाटील यांनी आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आज सायंकाळी भेट घेतली.

जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा काढू नये मनसे आमदार राजू पाटील यांचा भाजपला सल्ला
कल्याण- कल्याण ग्रामीणमध्ये भाजपने जागर यात्रा काढावी. गाजर यात्रा काढू नये असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला दिला आहे. सोशल मिडियावर कल्याण ग्रामीण विधान सभा मतदार संघात भाजप जागर यात्रा काढणार आहे अशी पोस्ट फिरत आहे. त्यावर आमदार पाटील यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे.
काही लोकांची सवय असते. चार वर्षे बरमूडा घालून बसतात. शेवटच्या वर्षी निवडणूका आल्या की बाहेर पडतात. आणि ते आत्ता बाहेर पडले आहेत. निवडणूका जवळ आल्या की काही तरी विषय घेऊन बोबांलये अशी काही लोकांची पद्धत आहे, अशी टिका आमदार पाटील यांनी भाजप नेत्यावर केली आहे.
आमदार पाटील यांनी आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आज सायंकाळी भेट घेतली. रिंग रोडचे डिमार्केशन, फेरीवाल्याचा विषय , रस्त्यावरील खड्डे, २७ गावातील कामगारांना४९९ कर्मचाऱ््यांचे किमान वेतनाची थकबाकी आहे. रिंग रोडची अलायमेंट हेदूटणे पासून कोपर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनेक बेकायदा बांधकामे झालेली आहेत. एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या समन्वय नसल्याने बरयाचशा समस्या आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक अधिकारी नेमा. माणकोली ब्रीजचा जसा प्रकार घडला. तसा प्रकार घडू नये यासाठी अधिकारी नेमणे गरजेचे आहे अशी मागणी केली.