डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:42 PM2021-10-07T12:42:56+5:302021-10-07T12:44:11+5:30

डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले.

mns mla performed aarti at Ganesh Temple in Dombivli | डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती

डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती

googlenewsNext

कल्याण: डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले.  मनसे आमदार राजू पाटील यांनी मन सैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले व त्यानंतर दुर्गा पूजा करत आरती केली. 

यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की कोणत्याही पक्षाची नाही तर जनभावना लक्षात घेता मंदिर उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना पण सरकारला जाग आली, मंदिर त्यांनी उघडली त्याबद्दल सरकारचे आभार मानतो. तर राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची भरपाई सरकारने दयावी. त्वरित पंचनामे करावे, पंचनाम्याच्या आधी ही शेतकऱ्यांना काही रक्कम दयावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.या वेळ वेळी अध्यक्ष श्री प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत, महिला शहर अध्यक्ष मंदाताई पाटील , सौ कोमल ताई पाटील, विधार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे उपस्थित होते.
 

Web Title: mns mla performed aarti at Ganesh Temple in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.