शिळफाटा रोडवरील खड्ड्यांबाबत मनसे आमदारानं घेतली MIDC अभियंत्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:18 IST2021-11-17T18:18:13+5:302021-11-17T18:18:20+5:30
हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

शिळफाटा रोडवरील खड्ड्यांबाबत मनसे आमदारानं घेतली MIDC अभियंत्यांची भेट
कल्याण - कल्याण शिळ फाटा ते पुजा पंजाब हॉटेल एमआयडीसी सर्विस रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे.नवी मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
याच रस्त्याच्या कामाबाबत मनसे आमदार पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना पत्र सुद्धा दिले . रस्त्याचे संपूर्ण काम केले जाईल.या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून १ महिन्याच्या कालावधी पूर्ण होईल असं सांगण्यात आलं.