शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:53 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

कल्याण : कल्याण ग्रामीण पाणीटंचाईच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर सोमवारी मनसे आणि भाजपने तहान मोर्चा काढला. यावेळी आयुक्त विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होत्या. काही महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. सर्वोदय मॉलपासून काढलेल्या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप माजी नगरसेविका रविना माळी, संदीप माळी, मनसेच्या महिला आघाडी प्रमुख मंदा पाटील आदी असंख्य मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकरी यावेळी ‘ केडी यमसी ’, ‘ आयुक्त माणूस चांगला, मात्र ठाण्याच्या वेशीला टांगला ’, ‘ २५ वर्षे खुर्च्या उबविल्या, मात्र नागरिकांची तहान भागविली नाही,’ असे विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.आमदार पाटील, चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालनात पोहचले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना पाहून दोन्ही आमदार संतापले. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत ? लोकप्रतिनिधींना आयुक्त आणि प्रशासन फालतू समजतात का? असा संतापजनक सवाल केला. आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. लोकप्रतिनिधींना हलक्यात घेणार असाल, तर महापालिकेस कुलूप लावणार आणि कोण आतमध्ये शिरतो हे पाहणार असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला. तर, आमदार चव्हाण यांनी पोलिसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पोलिसांनी मोर्चाची कल्पना प्रशासनाला दिली नाही का? असा संतप्त सवाल केला. एक तासाच्या चर्चेनंतर एमआयडीसीचे अधिकारी प्रकट झाले. महापालिकेचे अधिकारी पाण्याचे टँकर विकतात असा आरोप आमदारांनी केला. त्यावरून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.या आहेत मागण्याटँकरवर जीपीएस यंत्रणा बसवा, नव्याने झालेल्या बड्या गृहसंकुलाचा पाणीपुरवठा बंद करा, गोरगरीब जनतेला पाणी द्या, पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारा, या विविध मागण्यांची अंमलबजावणी तातडीने करून या बैठकीचे इतिवृत्त द्यावे, अशी  मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी बैठकीत केली.

त्यात गैर काय?हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेWaterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका