शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविले नाही तर सरकार खड्ड्यात गेल्या शिवाय राहणार नाही; रामदास आठवले यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:07 IST

"या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे."

कल्याण - राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली. या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे. खड्डे बुजविण्याचे काम केले जात नाही. खड्डे जर बुजविले नाही, तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लक्ष द्यावे, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हटले आहे. (Minister Ramdas Athawale Target Uddhav thackeray government over Potholes in kalyan) केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन डोंबिवली बलात्कार प्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते पक्षकारांशी बोलत होते.

फिल्म इंडस्ट्रीला ड्रग्जची लागण -जहाजावर पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच एनसीबीने छापा टाकाला. कारवाई केली. या कारवाईत शहारुख खानचा मुलगा असो किंवा कुणीही असो. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीजला ड्रग्जची लागण झालेली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईही ड्रग्ज मुक्त झाली पाहिजे, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्यावर अनेक प्रसंग राज्य सरकारकडून केवळ आश्वासन -मराठवाड्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील पिके पावसामुळे उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यासाठी राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. कोकणातही अशा प्रकारचे संकट आले होते. नाशिकमध्येही द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे. राज्यावर अनेक प्रसंग आले असताना राज्य सरकारकडून केवळ आश्वासनं दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा करुन भरीव मदत दिली पाहिजे याकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी  सरकारचे लक्ष वेधले आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPotholeखड्डे