शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

डोंबिवलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग, १५ दुकाने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 03:28 IST

Dombivali News : कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा येथील शंकरनगर भागातील दशरथ म्हात्रे कम्पाउंडमधील भंगार गोदामाला बुधवारी दुपारी २ ते २.३०च्या दरम्यान भीषण आग लागली.

 डोंबिवली : कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा येथील शंकरनगर भागातील दशरथ म्हात्रे कम्पाउंडमधील भंगार गोदामाला बुधवारी दुपारी २ ते २.३०च्या दरम्यान भीषण आग लागली. जुने फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, एसी व इतर भंगाराला लागलेल्या आगीत मोठे स्फोट झाले. येथील १५ दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, लहान-मोठ्या स्फोटांमुळे मनुष्यहानी होण्याच्या भीतीने परिसरातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अग्निशमन दलाच्या १५ ते २० बंबांच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.सोनारपाडा येथे इमारती, चाळी आणि महाविद्यालय असलेल्या नागरी वस्तीत हे गोदाम आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु, गोदामातील कामगार भंगार कटिंगचे काम करीत असताना विजेची वायर तुटल्याने स्पार्क झाला आणि आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. गोदामात मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याचा साठा असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि तासाभरात गोदामाला आगीचा मोठा विळखा पडला. आगीची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. परंतु, आगीची तीव्रता वाढल्याने कल्याणहूनही गाड्या तसेच पाण्याचे टँकर मोठ्या संख्येने मागविण्यात आले. तरीही, आग नियंत्रणात येत नव्हती. अखेर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई, ठाणे येथील अग्निशमन दलांस पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.आगीची तीव्रता पाहून गोदामाच्या शेजारील इमारती आणि घरातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरही तेथून सुरक्षितस्थळी नेण्यात आले. आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते. हे धुराचे लोट केवळ डोंबिवलीतूनच नाही, तर कल्याण पश्चिमेकडील गांधारी, खडकपाडा परिसरातूनही दिसत होते.बघ्यांची गर्दी, पोलिसांची कसरतएकीकडे आगीची तीव्रता वाढत असतानाच ती पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची गर्दीही वाढली होती. मोबाइलमध्ये ही घटना कैद करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. अधूनमधून स्फोट होताच बघे एकच पळ काढत असल्यामुळेही गोंधळ उडत होता. मुख्य रस्त्यापासून गोदामाला जाणारा रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या, टँकर यांचीही घटनास्थळी पोहोचताना कसरत होत होती.‘त्या’ घटनेची झाली आठवण२०१३ च्या डिसेंबरमध्ये कल्याण-शीळ रोडलगत दावडी गावातील भंगार गोदामात रसायनाच्या टाकीची तोडफोड करताना भीषण स्फोट झाला होता. तब्बल पाच हजार वजनाच्या टाकीचे तुकडे आसपासच्या ३०० मीटरच्या परिसरात उडाले होते. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारची घटना पाहता या घटनेची आठवण झाल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी उमटत होत्या. यंत्रणेवर आमदार संतापलेघटनास्थळी आमदार राजू पाटील, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, साहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, मनसेचे राजेश कदम, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, भाजपच्या मनीषा राणे दाखल झाल्या होत्या. भोपाळसारखी दुर्घटना घडल्याशिवाय यंत्रणांना जाग येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आ. पाटील यांनी व्यक्त केली. भिवंडीत कपड्याच्या गोदामाला आग, कपड्यांचा साठा जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली  भिवंडी : भिवंडीत आगींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कपड्यांची साठवणूक केलेल्या फातिमानगर परिसरामध्ये असलेल्या एका गोदामाला बुधवारी मध्यरात्री आग लागली. यात साठवून ठेवलेले कपडे जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.    यंत्रमाग कारखान्याच्या या गोदामात कपड्यांसह धाग्याचे कोम मोठ्या प्रमाणात साठवल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. फातिमानगर हा दाटीवाटीचा असलेला परिसर असून याच परिसराच्या मधोमध हे गोदाम आहे.   मध्यरात्री अचानक या गोदामाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.

टॅग्स :fireआगdombivaliडोंबिवली