कल्याणमध्ये टरबूज तुडवत मराठ्यांनी केला लाठीचार्जचा निषेध
By प्रशांत माने | Updated: September 3, 2023 14:22 IST2023-09-03T14:21:19+5:302023-09-03T14:22:49+5:30
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले.

कल्याणमध्ये टरबूज तुडवत मराठ्यांनी केला लाठीचार्जचा निषेध
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रविवारी कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनकर्त्यांकडून टरबूज पायाखाली तुडवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. ४८ तासात जर मागणी पूर्ण नाही झाली तर समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. मराठा मरू देखील शकतो आणि मारू देखील शकतो त्यामुळे पुढील जे आंदोलन होईल त्याची सर्व जबाबदारी सरकारची राहील याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.