माणगाव अपघाताची घटना दुर्दैवी; मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया
By प्रशांत माने | Updated: September 17, 2023 10:54 IST2023-09-17T10:53:34+5:302023-09-17T10:54:55+5:30
अपघातात २६ प्रवासी जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

माणगाव अपघाताची घटना दुर्दैवी; मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया
डोंबिवली: पहाटे मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी बसला झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अपघात कशामुळे झाला आणि कोणाच्या चुकीमुळे झाला याची माहिती नाही अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत दिली.
अपघातात २६ प्रवासी जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना आसपासच्या रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल केले गेले आहे. जखमींमधील १६ ते १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचार करुन शासनाच्या माध्यमातून त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली गेली आहे. बस ट्रकवर आदळून अपघात झाला आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद केली गेली आहे यात शंका नाही असेही चव्हाण म्हणाले.