भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच पोलीस कॉन्स्टेबल झाली- मंगल गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 02:57 PM2020-11-26T14:57:44+5:302020-11-26T14:57:55+5:30

गुरुवारी पाली भाषा प्रचार आणि प्रसार  ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. 

Mangal Gavit became a police constable only because of the Indian Constitution | भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच पोलीस कॉन्स्टेबल झाली- मंगल गावित

भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच पोलीस कॉन्स्टेबल झाली- मंगल गावित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण : इतर देशांपेक्षा आपल्या भारताचे संविधान नक्कीच चांगले आहे. प्रत्येक नागरिकाला न्याय हक्क देण्यात आलेला आहे. संविधानामुळेच मी पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकली, असे प्रतिपादन कोरोना योद्धा पोलीस कॉन्स्टेबल मंगल गावित यांनी केले. 

गुरुवारी पाली भाषा प्रचार आणि प्रसार  ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष पि.टी. धनविजय, शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते. 

 गावित म्हणाल्या की,  कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करायला पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन दुसऱ्याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना योद्धा म्हणून सम्राट अशोक शाळेने बोलावून सन्मान दिला, त्यांचे मी आभारी आहे, असे गावित म्हणाल्या. 

विद्यार्थ्यांनी एकाचवेळी ऑनलाइन संविधानाची प्रस्ताविकाचे वाचन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी  मुंबई २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. 

Web Title: Mangal Gavit became a police constable only because of the Indian Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.