पिस्तुलसह दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक! कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई
By प्रशांत माने | Updated: April 10, 2025 19:19 IST2025-04-10T19:19:47+5:302025-04-10T19:19:55+5:30
प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पुर्वेकडील नेतीवली चक्कीनाका परिसरात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून देशी ...

पिस्तुलसह दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक! कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई
प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: पुर्वेकडील नेतीवली चक्कीनाका परिसरात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून देशी बनावटीच्या पिस्तूलसह दोन जिवंत काडतुस आणि १ पुंगळी असा ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परवानगीशिवाय ही पिस्तुल आणि काडतुस बाळगल्याप्रकरणी बिनधास अनंता म्हात्रे याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई मिथुन राठोड यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हे अन्वेषणचे पोलिस शिपाई राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, चक्कीनाका, नेतीवली परिसरातील रिजेंन्सी पार्क येथे राहणा-या बिनधास म्हात्रे नामक व्यक्तीने त्याच्या घरात देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुसे लपवून ठेवली आहेत. ही माहीती मिळताच गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले, पोलिस हवालदार विजय जिरे, विलास कडू, पोलिसनाईक दिपक महाजन, पोलिस शिपाई विजेंद्र नवसारे, महिला पोलिस हवालदार ज्योत्स्ना कुंभारे आदिंच्या पथकाने म्हात्रे याच्या घरावर धाड टाकून त्याला पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. दरम्यान म्हात्रे याने पिस्तुल का बाळगले होते हे समजू शकलेले नाही याबाबत तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिंदे यांनी दिली.