शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

संघाचा ‘किल्ला’ भाजप राखणार? मनसेकडून उमेदवार नाही, उद्धवसेनेने खेळले ‘आगरी कार्ड’

By अनिकेत घमंडी | Updated: November 4, 2024 11:02 IST

Maharashtra Assembly Election 2024: रा. स्व. संघाचा डोंबिवली हा बालेकिल्ला असून, या ठिकाणी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत एकेकाळी जनसंघ आणि आता भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येत असल्याचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपतर्फे चौथ्यांदा रिंगणात आहेत.

- अनिकेत घमंडी डोंबिवली - रा. स्व. संघाचा डोंबिवली हा बालेकिल्ला असून, या ठिकाणी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत एकेकाळी जनसंघ आणि आता भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येत असल्याचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपतर्फे चौथ्यांदा रिंगणात आहेत. याही वेळेस ते संघाचा बालेकिल्ला राखणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेने आगरी कार्ड वापरत दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार न देता भाजपला सहकार्य केले.

चव्हाण यांनी २०१४ मध्ये दीपेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. २००९, २०१४, २०१९ पासून प्रत्येक वेळी चव्हाण यांचे मताधिक्य वाढत आहे. यावेळी ते सार्वजनिक बांधकाममंत्री असल्याने त्यांना किती मते पडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. २००९ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार स्व. हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून चव्हाण यांनी उमेदवारी मिळविली होती. त्यानंतर २०१४, २०१९ ला त्यांनी पक्षात वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना दोन गटांत विभागली गेली तेव्हा दीपेश शिंदेसेनेत गेले होते. मात्र, यंदा डोंबिवली मतदारसंघ महायुतीतील वाटपानुसार भाजपकडेच राहिल्याने म्हात्रे यांनी शिंदेसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत पुन्हा उद्धवसेनेची वाट धरत उमेदवारी मिळवली. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय? लोकसभेला शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच लढत झाली होती. शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, तर उद्धवसेनेकडून वैशाली दरेकर-राणे रिंगणात होते. शिंदे यांना डोंबिवलीमध्ये ९९ हजार ७०० मते मिळाली. शिंदे यांच्या विजयात डोंबिवलीच्या मतांचा मोठा वाटा आहे. २०२४ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना पाच लाख ८९ हजार ६३६ मते, तर वैशाली दरेकर-राणे यांना तीन लाख ८० हजार ४९२ मते मिळाली होती. 

कळीचे मुद्देभाजपचा हा बालेकिल्ला आहे. चव्हाण यांना डोंबिवलीमधून नेहमीसारखी आघाडी मिळवावी लागणार आहे. उद्धवसेनेची आगरी कार्ड खेळण्याची रणनीती यशस्वी होणार का, याची चर्चा सुरू आहे.या भागात अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, फेरीवाले, अनधिकृत बांधकामे या समस्या आहेत. क्लस्टर योजनेची अंमलबजावणी, नवा डीपी मंजूर करणे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dombivali-acडोंबिवलीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024big Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४