शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये प्रेमविवाहातून तरुणाची हत्या, बायकोसमोरच भरदिवसा दगडाने ठेचले; दोन आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 06:10 IST

तरुणाला मारहाण होत असताना त्याची पत्नी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती मात्र आरोपीने त्याच्या पत्नीला बाजूला सारत या तरुणाची हत्या केली.

 अंबरनाथ : अंबरनाथमध्ये प्रेमविवाह केल्याच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेला घडलेला हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरदिवसा हा प्रकार घडला असून कोणीही त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. शिवाजीनगर पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.विजय नवलगिरे (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. विजय याने ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला? होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातील काही तरुण विजयला आमच्या भागातील मुलीशी प्रेमविवाह का केला? असे म्हणत काही दिवसापासून त्रास देत होते. त्यातूनच गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजयच्या घरी ५ ते ७ तरुण आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घातली. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.तरुणाला मारहाण होत असताना त्याची पत्नी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती मात्र आरोपीने त्याच्या पत्नीला बाजूला सारत या तरुणाची हत्या केली. मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरु असताना एका अनोळखी व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPolice Stationपोलीस ठाणे