कल्याण पूर्वेतील ९ बेकायदा बांधकामांवर केडीएमसीचा हातोडा

By मुरलीधर भवार | Updated: March 18, 2024 19:49 IST2024-03-18T19:49:03+5:302024-03-18T19:49:15+5:30

कल्याण -शहराच्या पूर्व भागातील द्वारली आणि दावडी परिसरातील ९ बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेच्या कारवाई पथकाने हातोडा चालविला आहे. महापालिका ...

KDMC's hammer on 9 illegal constructions in Kalyan East | कल्याण पूर्वेतील ९ बेकायदा बांधकामांवर केडीएमसीचा हातोडा

कल्याण पूर्वेतील ९ बेकायदा बांधकामांवर केडीएमसीचा हातोडा

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील द्वारली आणि दावडी परिसरातील ९ बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेच्या कारवाई पथकाने हातोडा चालविला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. इंदुूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली आहे.

द्वारली, मलंग रोड आणि दावडी येथील एकूण ९ बेकायदा बांधकामे जमिनदोस्त केली. जमीनदोस्त करण्यात आलेले बहुतांश गाळे हे बांधकाम मटेरियल व्यावसायिकांचे होते. ही कारवाई महापालिका पोलीस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

Web Title: KDMC's hammer on 9 illegal constructions in Kalyan East