KDMC : केडीएमसी आयुक्तांकडून प्रभाग अधिका-यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:46 IST2021-03-17T20:45:34+5:302021-03-17T20:46:09+5:30
KDMC News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी 10 पैकी 7 प्रभाग क्षेत्र अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.

KDMC : केडीएमसी आयुक्तांकडून प्रभाग अधिका-यांच्या बदल्या
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी 10 पैकी 7 प्रभाग क्षेत्र अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.
कल्याणच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. बांधकामाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी 15 हजरांची लाच घेताना या दोघांना ठाणे अँटी करप्शनने पकडले होते. अधिकाऱ्यांच्या बदल्या करत एकप्रकारे लाचखोरी कोणत्याही स्वरूपात सहन केली जाणार नसल्याचा संदेश आयुक्तांनी दिला आहे. मात्र बदल्या करून केडीएमसीला लागलेली लाचखोरीची लत संपुष्टात येईल का हाच खरा प्रश्न आहे.
या 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या
सुधीर मोकल - अ क्षेत्रातून, ड प्रभाग क्षेत्रात
सुहास गुप्ते - ब क्षेत्रातून , ह प्रभाग क्षेत्रात
भरत पाटील - जे क्षेत्रातून, फ प्रभागक्षेत्रात
वसंत भोंगाडे - ड क्षेत्रातून, जे प्रभागक्षेत्रात
राजेश सावंत - फ क्षेत्रातून, अ प्रभागक्षेत्रात
भारत पवार - ह क्षेत्रातून, ई प्रभागक्षेत्रात
अक्षय गुडधे - ई क्षेत्रातून , क प्रभागक्षेत्रात