मास्क न परिधान केलेल्या व्यक्तींकडून पावणे आठ लाखाहूनही अधिक दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:55 IST2021-10-02T15:51:42+5:302021-10-02T15:55:02+5:30
शुक्रवार दिवसभरात एकूण ४४ व्यक्तीकडून २२ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क न परिधान केलेल्या व्यक्तींकडून पावणे आठ लाखाहूनही अधिक दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत आहे. अजून काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याने डिसेंबरमध्ये घराबाहेर विना मास्क फिरणा-या १ हजार ५९७ व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने ७ लाख ९८ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
काल दिवसभरात एकूण ४४ व्यक्तीकडून २२ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.