बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

By मुरलीधर भवार | Updated: February 8, 2024 18:31 IST2024-02-08T18:30:53+5:302024-02-08T18:31:34+5:30

ही कारवाई सहायक आयुक्त धनंजय थोरात यांनी केली.

kdmc hammer on illegal construction | बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

मुरलीधर भवार-कल्याण: शहराच्या पूर्व भागातील पुना लिंक रोडच्या बाजूला असलेल्या आर. के. बाजार अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त धनंजय थोरात यांनी केली.

पिसवली गावातील देशमुख होम्स येथील सुरु असलेले अनधिकृत १० रुम, ३ जोते, ३ शेडस्, २ टपऱ्या पाडण्याची कारवाई केली गेली. यावेळी दोन हातगाड्या जप्त करण्यात आल्या. सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली गेली.

Web Title: kdmc hammer on illegal construction