महिला दिनी केडीएमसीच्या वतीने आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण
By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2025 21:02 IST2025-03-08T21:01:24+5:302025-03-08T21:02:14+5:30
Kalyan News: जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधत कल्याण डोंबिवली महापालिकेने तीन ठिकाणी बांधलेल्या आकांक्षी शाैचालयाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला दिनी केडीएमसीच्या वतीने आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण
- मुरलीधर भवार
कल्याण - जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधत कल्याण डोंबिवली महापालिकेने तीन ठिकाणी बांधलेल्या आकांक्षी शाैचालयाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रा शेजारी, आधारवाडी अग्निशमन केंद्रासमोर आणि राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या नजीक आकांक्षी शौचालय सुरू आले आहे. आणखी ६ ठिकाणी हे आकांक्षी शौचालय उभारण्याचे काम सुरू आहे. आयुक्त जाखड यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आकांक्षी शौचालय ही संकल्पना संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही शौचालये महत्त्वाची आहे. ही योजना महिलांना समर्पित करण्यात आली आहे. महिलांची सुरक्षा, ऑटोमॅटिक स्वच्छता प्रणाली, दिव्यांग नागरिकांसाठीविशेष सुविधा यांसह या शौचालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केवळ महिलाच नव्हे, तर सर्व नागरिक अत्यल्प शुल्क देऊन शौचालयाचा वापर करू शकतात.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगूळ यांच्यासह अशोका डेव्हलपर्सच्या संचालिका शमिती सूद, व्यवस्थापक पी. एच. राबडिया, धनश्री भोसले, सुरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.