बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा
By मुरलीधर भवार | Updated: January 21, 2023 19:54 IST2023-01-21T19:54:16+5:302023-01-21T19:54:21+5:30
कल्याण-रेरा आणि केडीएमसीची फसवणूक केल्या प्रकरणातील आजदे गाेळवली येतील बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे. आजदे गाेळवली ...

बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा
कल्याण-रेरा आणि केडीएमसीची फसवणूक केल्या प्रकरणातील आजदे गाेळवली येतील बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे.
आजदे गाेळवली येथील बाेगस बांधकाम परवानगी प्रकरणातील अर्जून गायकर आणि इतर, मेसर्स आेम साई कन्स्ट्रक्शनच्या वतीने राजन भाेजने यांच्या आरसीसी
आरसीसी तळ अधिक पाच मजल्याच्या बांधकामावर काल धडक कारवाई करण्यात आली. पाेलिस बंदाेबस्तात जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर यांच्या सहाय्याने ही पाडकामाची कारवाई केली गेली
दरम्यान डाेंबिवली पश्चिमेतील भारतमाता शाळेजवळ सरकारी भूखंडावर झालेल्या प्लींथ बांधकाम पू्र्ण उखडून टाकण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी केली आहे. कारवाई सरकारी भूखंडावर असल्याने कल्याण तहसील कार्यालयाचे तलाठी, मंडळ अधिकारी, यांच्या उपस्थित पाेलिस बंदाेबस्तात करण्यात आली.