शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan News | कल्याण-तळोजा मेट्रोचे पुढचे पाऊल, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा

By नारायण जाधव | Updated: December 31, 2022 20:55 IST

२०.७५ किलोमीटरचा असेल मार्ग

नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या चार महानगरांच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या मार्गांचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या मार्गातील सर्व १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे. मेट्रो-१२ हा मेट्रो-५चा विस्तार असून, हा संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५८६५ कोटी इतका असून, या मार्गात १७ स्थानके असतील. स्थानक, फलाटांचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामासाठी कंत्राटदारांचा शोध एमएमआरडीएने सुरू केला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू केली असून, २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. यामुळे नव्या वर्षातच ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा उघडून नंतर कंत्राटदार नेमून कामास सुरुवात होणार आहे.

'या' स्थानकांचा समावेश- या मार्गात १७ उन्नत स्थानके असतील. यात गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे; तर निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत राहणार आहे. तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार असून, सोबत आणखी एक अतिरिक्त ट्रॅक राहणार आहे.

पिसावेत डेपो- मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे असेल. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपो म्हटले की, कारशेडही आली. यामुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे.

शीळफाटा-तळोजा-पनेवलला फायदा- या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. येत्या काळात निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर उभे राहत आहे, तर शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह इतर बांधकाम व्यावसायिकांच्या खासगी टाऊनशिप आकार घेत आहेत. याच भागात बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे.

तीन मेट्रो एकमेकांस जोडणार- सध्या काम सुरू असलेली ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजुरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण मेट्रो ही मेट्रो १२ ही कल्याण येथेच जोडली जाणार असून, निळजेच्या आसपास ती कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार आहे.

२६८.५३ कोटीचा सल्लागार- मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजासाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए आणि मेसर्स डी.बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबीच यांची संयुक्त निविदे एमएमआरडीएने आपल्या २७१ व्या बैठकीत मान्यता दिली आहे. सल्लागारांवरील ही रक्कम २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये आहे.

टॅग्स :kalyanकल्याणMetroमेट्रोrailwayरेल्वे