कल्याण रेल्वे पोलिसांनी केले 350 मोबाइल परत; किंमत एक कोटीच्या घरात, प्रवाशांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:00 IST2020-12-29T23:00:16+5:302020-12-29T23:00:21+5:30
कल्याण : रेल्वे प्रवासादरम्यान वर्षभरात हरवलेले व चोरी गेलेले ३५० मोबाइल रेल्वे पोलिसांनी एका महिन्यात परत केले आहेत. या ...

कल्याण रेल्वे पोलिसांनी केले 350 मोबाइल परत; किंमत एक कोटीच्या घरात, प्रवाशांमध्ये समाधान
कल्याण : रेल्वे प्रवासादरम्यान वर्षभरात हरवलेले व चोरी गेलेले ३५० मोबाइल रेल्वे पोलिसांनी एका महिन्यात परत केले आहेत. या ३५० मोबाइलची किंमत जवळपास एक कोटी रुपयांच्या घरात आहे. पोलिसांच्या या कामगिरीविषयी प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण ते कसारा, कल्याण ते बदलापर्यंतची सगळी स्थानके येतात. या स्थानकांतून दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. वर्षभरात प्रवासादरम्यान प्रवशांकडून हरवलेले, तसेच चोरीला गेलेले असे एकूण ३५० मोबाइल रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना परत केले आहेत, तर काही तपास प्रकरणांत हस्तगत केलेले मोबाइल हे न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ते प्रवाशांना परत केले जाणार आहेत. काही प्रवाशांचे पत्ते शोधून तर काहींच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू पोलिसांनी परत केल्या आहेत. त्यामुळे वर्षअखेरीस नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.