Kalyan Railway Police arrested a vagrant who robbed passengers by throwing narcotics in a soft drink | शितपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामटय़ाला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक

शितपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामटय़ाला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक

कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामटय़ाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदराम चौधरी असे त्या भामटय़ाचे नाव असून आत्तार्पयत अनेक जणांना यांनी लूटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये अनोळखी व्यक्तीकडून काही खायला किंवा प्यायला घेत असाल तर आता सावधान रहाण्यास सांगितले आहे.

काही दिवसापूर्वी दिलीपभाई साकला, रा. बंगळुरु ही व्यक्ती कल्याणरेल्वे पोलिस ठाण्यात आपली तक्रार घेऊन आले होते. पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, ट्रेनमध्ये एका युवकाने माज्यासोबत मैत्री केली. त्याने त्यांच्याकरीता शीतपेय आणले. ते घेतल्यावर त्यांना झोप आली. पोलिस समजून गेले की, त्यांना गंडा घालण्यात आला आहे.पोलिसांनीही तपास सुरु केला. तेव्हा वडदोरा रेल्वे पोलिसांकडून माहिती मिळाली की, चौधरी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.ज्यांनी कल्याण जवळपास ट्रेनमध्ये एका व्यक्तीला लूटले होते. या प्रकरणी वरीष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांचे म्हणणे आहे की, चौधरी हीच व्यक्ती आहे की ज्याने त्या प्रवाशालाही लूटले होते.

या प्रकरणात पूढील तपास केल्यानंतर राजस्थानहून चोरी गेलेला महागडे ब्रेसलेट पोलिसांनी हस्तगत केले आहे. चौधरी हा राजस्थानचा राहणारा आहे. चांगल्या घरातील आहे. त्याला आफीमचे व्यसन आहे. तो रेल्वेतून तिकीट घेऊन प्रवास करतो आणि खाण्या पिण्याच्या पदार्थामध्ये गुंगीचे औषध देऊन लूटतो. वडदोरामध्ये अशा प्रकारचे त्याने दोन गु्न्हे केले आहे. या व्यतिरिक्त चौधरी याने अशा प्रकारे किती लोकांना गंडा घातला आहे. याचा तपास सुरु आहे.त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये अनोळखी व्यक्तीकडून काही खायला किंवा प्यायला घेत असाल तर आता सावधान रहा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Kalyan Railway Police arrested a vagrant who robbed passengers by throwing narcotics in a soft drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.