Kalyan: कल्याण भोईरवाडी परिसरातील इमारतीमधील घराला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
By मुरलीधर भवार | Updated: November 15, 2023 23:42 IST2023-11-15T23:41:29+5:302023-11-15T23:42:33+5:30
Fire In Kalyan: कल्याण मधील भोईरवाडी परिसरातील चिंतामण अपार्टमेंट इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील एका घराला आग लागल्याची घटना आज रात्री साडे दहा वाजण्याचा सुमारास घडली . आगीची माहिती मिळतच तत्काळ अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं .

Kalyan: कल्याण भोईरवाडी परिसरातील इमारतीमधील घराला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण मधील भोईरवाडी परिसरातील चिंतामण अपार्टमेंट इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील एका घराला आग लागल्याची घटना आज रात्री साडे दहा वाजण्याचा सुमारास घडली . आगीची माहिती मिळतच तत्काळ अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं . आग लागल्याचे लक्षातच कुटुंबाने घराबाहेर पळ काढला त्यामुळे सुदैवाने जीवित हानि झाले नाही मात्र या घटनेत घरातील सामान जळून खाक झाले . या घराच्या गॅलरीत आग लागली होती घरामध्ये टीव्ही रिपेरिंग चे काम केलं जात होते .आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान सायंकाळी आठ वाजता सुमारास खडकपाडा येथील अमृत हेवन या इमारतीमधील एका घराला आग लागली होती त्यानंतर दोन तासाने पुन्हा भोईरवाडी परिसरात इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली.