दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

By सचिन सागरे | Updated: April 11, 2023 18:36 IST2023-04-11T18:35:27+5:302023-04-11T18:36:00+5:30

 दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

   Kalyan District Sessions Court on Tuesday awarded life imprisonment to the biological father who abused a ten-year-old girl  | दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

कल्याण : दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कल्याण तालुका परिसरातील टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी राहत होता. त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्याला दहा वर्षांची मुलगी व तिच्यापेक्षा लहान मुलगा होता. 

ती सुमारे सात वर्षांची असल्यापासून रात्रीच्यावेळी आरोपी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये आरोपीने मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास अधिकारी व्यंकटेश आंधळे यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील कदंबिनी खंडागळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी शरयू हिंदुराव व कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या महिला शिपाई अर्चना गोपाळे यांनी त्यांना मदत केली.
 

 

Web Title:    Kalyan District Sessions Court on Tuesday awarded life imprisonment to the biological father who abused a ten-year-old girl 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.