कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी
By प्रशांत माने | Updated: August 25, 2024 17:05 IST2024-08-25T17:02:37+5:302024-08-25T17:05:12+5:30
Kalyan News: राज्यभरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण पूर्व भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी
- प्रशांत माने
कल्याण - राज्यभरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण पूर्व भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी धर्मेंद्र यादव ( वय ३२) या नराधमाला अटक केली आहे.
आरोपी यादव आणि पिडीत मुलगी एकाच परिसरात राहते. पंधरा दिवसांपुर्वीच आरोपी त्या ठिकाणी राहायला आला होता. शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास ती आरोपी यादवच्या घरात खेळायला गेली असताना लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार घडला. मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी त्वरित मुली सोबत मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. या घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीसांनी यादवला बेडया ठोकल्या आहेत. पिडीतेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यादवने आणखी काही मुलींसोबत असा काही प्रकार केला आहे का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बदलापूरच्या घटनेनंतर डोंबिवलीत एका तरूणाने १२ वर्षांच्या दोन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर आता कल्याण पूर्वेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आहे. आरोपी यादवला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.