पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली

By मुरलीधर भवार | Updated: January 6, 2024 16:12 IST2024-01-06T16:11:49+5:302024-01-06T16:12:03+5:30

पोलिसांच्या कामकाजाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Joint rally of police and students on the occasion of police anniversary week | पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली

पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली

कल्याण- पोलीस वर्धापन सप्ताह दिनानिमित्त कल्याणचे पेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, शहर वाहतूक उपशाखा कल्याण, आरएसपी विभाग अशी संयुक्तरित्या शालेय विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती.

रॅली दरम्यान ठाणे शहर पोलीस बँड पथकाकडून देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.. कल्याण सहाय्यक पोलिआयुक्त कार्यालयात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिसांचे कामकाज, शस्त्रांबाबत, पोलिसांच्या पदांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली . पोलीसांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी महाविद्यालयात, शाळांमध्ये देखील पोलीस सप्ताह दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती घेटे यांनी दिली.

Web Title: Joint rally of police and students on the occasion of police anniversary week

टॅग्स :kalyanकल्याण