कल्याण डोंबिवलीत राहूल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: November 17, 2022 15:33 IST2022-11-17T15:32:31+5:302022-11-17T15:33:14+5:30

राहूल गांधी विरोधात बाळासाहेबांची शिवेसना पक्षाच्या कार्यकर्ते कल्याण डोंबिवलीत आक्रमक झाले आहेत.

Jode maro movement against Rahul Gandhi in Kalyan Dombivli | कल्याण डोंबिवलीत राहूल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

कल्याण डोंबिवलीत राहूल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

कल्याण-राहूल गांधी विरोधात बाळासाहेबांची शिवेसना पक्षाच्या कार्यकर्ते कल्याण डोंबिवलीत आक्रमक झाले आहेत. राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, तालुका प्रमुख महेश पाटील यांनी राहूल गांधी यांच्या प्रतिमेला कोल्हापूरी चप्पल मारो आंदोलन आले. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेत शहर प्रमुख रवी पाटील , महिला पदाधिकारी छाया वाघमारे, नेत्रा उगले यांनी देखील जोडे मारो आंदोलन कल्याणच्या शिवाजी चौकात केले.

तसेच कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आहे. या वेळी असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. राहूल गांधी यांच्या प्रतिमेची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली. राहूल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
 

Web Title: Jode maro movement against Rahul Gandhi in Kalyan Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.