शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत जितेंद्र आव्हाडांचा भाजपासोबत शिवसेनेलाही दणका, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:02 IST

Kalyan-Dombivali News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील सहा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. यात भाजपा, शिवसेना आणि एमआयएमचा प्रत्येकी एक आणि एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.

मुंबई - कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपा आणि एमआयएमसोबत राज्यातील सत्तेमधील सहकारी असलेल्या शिवसेनेलाही दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील सहा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. यात भाजपा, शिवसेना आणि एमआयएमचा प्रत्येकी एक आणि दोन अपक्ष  माजी नगरसेवकांचा  समावेश आहे. तसेच बसपाच्याही एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.  

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची मुदत वर्षभरापूर्वीच संपली आहे. तसेच येथे यावर्षाच्या अखेरीपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पक्षांतर घडवून आणले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या पुढाकाराने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये भाजपच्या सुनिता खंडागळे, शिवसेनेच्या उर्मिला गोसावी, एमआयएमच्या तंजविला मौलवी आणि अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील,  फैजल जलाल ( अपक्ष ), रामभाऊ ओव्हाळ ( बसपा)  यांचा समावेश आहे. एकाच वेळी सहा माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.  

या माजी नगरसेवकांसह मनसेचे कल्याण पूर्वेतील युवा संघटक संदीप टावरे, माजी शाखा अध्यक्ष रियाज शेख,  युवासेना कल्याण पूर्व संघटक जिवा भोसले, युवा सेना अधिकारी मनोज गायकवाड, समाजवादी पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष शिवसागर यादव , एम आय एम चे ठाणे जिल्हाध्यक्ष आयाज मौलवी आदिंनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, डॉ वंडार पाटील, प्रमोद हिंदूराव, शरद महाजन, रमेश हनुमंते आदिंसह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा