आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या पर्समधून सात तोळ्याचे दागिने चोरट्याने लांबवले
By सचिन सागरे | Updated: December 24, 2023 20:18 IST2023-12-24T20:18:28+5:302023-12-24T20:18:48+5:30
या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या पर्समधून सात तोळ्याचे दागिने चोरट्याने लांबवले
कल्याण: गावी जाण्याकरिता एसटीमध्ये चढताना एका आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या पर्समधून चोरट्याने सात तोळे सोन्याचे दागिने लंपास करत पोबारा केल्याची घटना शनिवारी कल्याण एसटी डेपोमध्ये घडली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
सारिका शिंदे (रा. विजयनगर, कल्याण) आपल्या दोन मुलांसह गावी जाण्यासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कल्याण एसटी डेपोमध्ये एसटीची वाट पाहत होत्या. त्यांच्याकडे असलेल्या पर्समध्ये सात तोळे सोन्याचे दागिने होते. गावी जाणारी एसटी आल्याने सारिका बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. काही वेळानंतर पर्समधून दागिने चोरीला गेल्याचे सारिका यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सारिका यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.