गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By प्रशांत माने | Updated: January 28, 2025 21:00 IST2025-01-28T21:00:35+5:302025-01-28T21:00:57+5:30

सहा लाखांचा २९ किलो ९५५ ग्रॅम गांजा जप्त

interstate gang selling marijuana busted | गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: दोन दिवसात ५ लाख ९७ हजार ७८० रूपयांचा एकूण २९ किलो ९५५ ग्रॅम गांजा जप्त करीत पोलिसांनी अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी विशेष पथक आणि डोंबिवली पोलिस ठाणे यांनी ही कारवाई केली असून यात तीन आरोपींना अटक केली आहे.

अंमली विरोधी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण आणि त्यांच्या पथकाने सोमवारी डोंबिवली पुर्वेकडील आयरेगाव, येथील रेल्वे पटरीजवळ किरण शहा ( वय ४२) याला संशयास्पद हालचाल करताना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ४० हजाराचा ७ किलो ६६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळुन आला. त्याच्याविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुस-या घटनेत पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकासह डोंबिवली पोलिस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी चोळेगाव तलावाजवळ शिवमंदिराजवळ सापळा लावून गांजा विकण्यासाठी आलेल्या सचिन मोरे (वय २१) रा. मोहला, मध्यप्रदेश, आणि संजु लुहार (वय २४) रा. इनाहीकी, मध्यप्रदेश या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेतून चार लाख ५७ हजार ७८० रुपये किमतीचा २२ किलो ८८९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान आरोपींनी गांजा कोठून आणि कोणाकडून आणला आहे तसेच ते याठिकाणी गांजा कोणाला विक्री करणार होते याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त झेंडे यांनी दिली.

Web Title: interstate gang selling marijuana busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.