माझी वसुंधरा अभियानात केडीएमसीची बाजी, पटकावला 16 वा क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 12:28 IST2022-06-06T12:24:12+5:302022-06-06T12:28:40+5:30

मुंबई येथे पार पडलेल्या सोहळ्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, यांच्या हस्ते हा पुरस्कार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला

In my Vasundhara Abhiyan, KDMC won the second place | माझी वसुंधरा अभियानात केडीएमसीची बाजी, पटकावला 16 वा क्रमांक

माझी वसुंधरा अभियानात केडीएमसीची बाजी, पटकावला 16 वा क्रमांक

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पुन्हा राज्यात नावलौकिक मिळवला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 22 क्रमांक ओलांडून सोळावा क्रमांक पटकावला आहे. तर हाई जंप श्रेणीचे द्वितीय पारितोषिक देखील प्राप्त केले. 

मुंबई येथे पार पडलेल्या सोहळ्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, यांच्या हस्ते हा पुरस्कार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. आयुक्त सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर महापालिकेने अमृत श्रेणी अंतर्गत 5500 पैकी एकूण 3371 गुणांसह 16 वा क्रमांक पटकावला आहे. या श्रेणीमध्ये महानगरपालिकेने  रँकिंगमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सर्वोच्च, अतुलनीय कामगिरी करून थेट 16 व्या स्थानी झेप घेतली असल्यामुळे, महापालिकेस हाय जंप श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: In my Vasundhara Abhiyan, KDMC won the second place