शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कपिल पाटलांच्या बैठकीला कथोरेंची दांडी, दिलजमाईनंतरही नाराजी सत्र सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 05:38 IST

उमेदवारी जाहीर होताच पाटील यांनी कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

बदलापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपने बदलापुरात आयोजित केलेल्या बैठकीकडे आमदार किसन कथोरे यांनी पाठ फिरवल्याने पाटील-कथोरे यांच्यातील भेटीनंतरही उभयतांमधील वाद संपुष्टात आले नसल्याची चर्चा सुरू आहे. उमेदवारी जाहीर होताच पाटील यांनी कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कथोरे हे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होतील, अशी अपेक्षा होती. बदलापुरात मंगळवारी सायंकाळी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या पहिल्याच बैठकीला कथोरे गैरहजर राहिले. ते न दिसल्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली. काही पदाधिकाऱ्यांनीही त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. कथोरे बैठकीला हजर राहणार नाहीत, याची कल्पना असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला. 

या बैठकीची कल्पना देण्यात आली होती. मात्र, सकाळपासून मी मुंबईत एका कामानिमित्त असल्यामुळे मला बदलापूरच्या बैठकीला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.-किसन कथोरे, आमदार

शिंदेंसमोर भाजप पदाधिकारी बसले गप्पदरम्यान, अंबरनाथमध्ये कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहणारे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांना बैठकीत नाराजी व्यक्त न करण्याची तंबी भाजपच्या नेतृत्वाने दिल्याने भाजपची मंडळी या बैठकीत चिडीचूप होती. भाजपला वेगवेगळ्या बाबतीत मिळणारी सापत्न वागणूक व कार्यक्रमांना डावलणे यावरून शिवसेना व भाजपच्या मंडळींत गेले काही दिवस वाद सुरू आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अलीकडेच त्याला वाचा फोडली होती.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbadlapurबदलापूर