डोंबिवलीत नागरीकांना अर्ध्या रात्री जबदरस्तीने घराबाहेर काढून घरांवर फिरवला बुलडोझर

By मुरलीधर भवार | Published: April 8, 2024 07:30 PM2024-04-08T19:30:34+5:302024-04-08T19:31:20+5:30

नागरीकांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

In Dombivli, civilians were forcibly taken out of their homes in the middle of the night and bulldozers rolled over their houses | डोंबिवलीत नागरीकांना अर्ध्या रात्री जबदरस्तीने घराबाहेर काढून घरांवर फिरवला बुलडोझर

डोंबिवलीत नागरीकांना अर्ध्या रात्री जबदरस्तीने घराबाहेर काढून घरांवर फिरवला बुलडोझर

डोंबिवली-शहराच्या पूर्व भागातील टाटालाईन येथील नागरीकांना रात्री दाेन वाजता घराबाहेर काढून त्यांच्या घराव बुलडोझर फिरविण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नागरीकांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

टाटा लाईन परिसरात राहणारे लोक आपल्या घरात झोपले होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आली. त्यामुळे झोपेतून जागे झालेले लोक काय झाले आहे. कोण लोक आले आहेत. हे पाहण्यासाठी घराबाहेर आले काही लोक घराबाहेर पडले. घराबाहेर येताच लोकांनी पाहिले की, बाहेर काही लोक आले होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. लाकडी दांगड हेाते. लोकांनी त्यांना काय झाले कशासाठी आलात हे विचारणापूर्वीच त्यांना घरातून जबदरस्तीने काढण्यास सुरुवात केली. त्यांनी सोबत बुलडोझरही आणला होता. नागरीकांचा विरोध न जुमानता त्याठिकाणी सात घरांवर बुलडोझर फिरवला. सात नागरीकांना घरातून बेघर केले. या घटनेमुळे त्याठिकाणी रात्री एकच गोंधळाची परिस्थिती उद्धवली होती.

नागरीकांनी पोलिसांना संपर्क साधला. त्याठिकाणी पोलिस पोहचले. पिडीत कुटुंबांपैकी नंदू माने यांनी सांगितले की, बिल्डरने एका व्यक्तिला हाताशी धरुन आम्हाला अर्ध्या रात्री घरातून जबरदस्तीने बाहेर काढत आमची घरे जमीनदोस्त केली आहे. आम्ही अशा परिस्थिती कुठे जाणार आणि कुठे राहणार असा प्रश्न आमच्यासमोर आहे. पोलिसांनी घरे पाडणाऱ््यावर कारवाई करावी. आम्हाला न्याय द्यावा. या संदर्भात रामनगर पोलिसांनी सांगितले की, आमच्याकडे या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी केली जाईल.

Web Title: In Dombivli, civilians were forcibly taken out of their homes in the middle of the night and bulldozers rolled over their houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.