डोंबिवलीतील धक्कादायक घटना; दुसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला, तरुणाच्या प्रसंगावधनामुळे वाचला जीव
By प्रशांत माने | Updated: January 26, 2025 20:29 IST2025-01-26T20:28:24+5:302025-01-26T20:29:45+5:30
घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवलीतील धक्कादायक घटना; दुसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला, तरुणाच्या प्रसंगावधनामुळे वाचला जीव
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा चिमुकला खाली पडला मात्र तरुणाच्या सतर्कता आणि प्रसंगावधनामुळे या चिमुकल्याचा जीव वाचला.
डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा गावदेवी मंदिराजवळील अनुराज हाइट्स टॉवर या १३ मजली इमारतीत शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा चिमुकला खाली पडला मात्र इमारतीखाली भावेश म्हात्रे आणि त्याचे सहकारी उभे होते .
भावेशचे लक्ष खाली पडणाऱ्या बाळाकडे गेलं . भावेशने प्रसंगावधान दाखल तत्काळ बाळाच्या दिशेने धाव घेतली . खाली पडणाऱ्या या बाळाला त्याने झेलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हाताला लागून बाळ त्याच्या पायावर पडलं. या घटनेत बाळाला दुखापत झाली असली तरी बाळाचा जीव बचावलाय . भावेशने दाखवलेल्या प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.