शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात भाऊजीने केली मेहुणीची हत्या; पत्नी आणि सासूलाही मारहाण करत केलं जखमी

By पंकज पाटील | Updated: November 28, 2022 19:30 IST

बदलापुरात भाऊजीने मेहुणीची हत्या केली असून पत्नी आणि सासूलाही मारहाण करून जखमी केले आहे. 

बदलापूर : मालमत्तेच्या वादातून झालेके पती पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुणीची भाऊजीने हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये आज घडली. यात आरोपीने पत्नी आणि सासूवरही हल्ला करत जखमी केले आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर गावातील सनसेट हाईट इमारतीत फरीदा सय्यद या त्यांच्या दोन मुली निलोफर आणि सनोबर, तसेच नातवंडांसोबत राहतात. त्यांची मुलगी नीलोफर ही विवाहित असून पतीसोबत वाद सुरू असल्याने ती आईकडेच वास्तव्याला आहे. 

आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास नीलोफरचा पती मोहम्मद आयुब शेख हा सासूच्या घरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटायला आला. मात्र दरवाजा उघडताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने निलोफरवर हल्ला चढवला. या हल्ल्यात निलोफर ही गंभीर जखमी झाली, हे पाहून त्याची मेहुणी सनोबर आणि तिची आई फरीदा या दोघी निलोफरला वाचवायला मध्ये पडल्या. मात्र मोहम्मदने त्या दोघींवरही हल्ला चढवला. यामध्ये सनोबरचा जागीच मृत्यू झाला, तर फरीदा सय्यद जखमी झाल्या. यावेळी स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरीदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद शेख हा दुबईला कामाला होता. पत्नी नीलोफर सोबत त्याचे पटत नसल्यामुळे ते दोघेही वेगळे राहत होते. मात्र जोगेश्वरीच्या प्रॉपर्टीवरून या दोघांमध्ये वाद होते. याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद आयुब शेख याला पोलिसांनी अटक केली.

  

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू