कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:26 PM2021-10-18T19:26:17+5:302021-10-18T19:26:32+5:30

सद्यस्थितीत निर्माण होणा-या कच-याचे 80-90 टक्के  वर्गीकरणही होत आहे , असे असतांनाही शहरात काही ठिकाणी कचरा पडत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होतात.

An important meeting was held on the issue of waste kalyan Dombivali | कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न 

कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

25 मे 2020 पासून महानगरपालिकेने  शुन्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे तसेच संपूर्ण परिसर सातत्याने स्वच्छ राहण्यासाठी सध्या कायापालट अभियानही शहरात सुरू आहे. मात्र शहरात अजूनही  कच-याची समस्या उदभवत असल्याने याबाबत केडीएमसी मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. 

सद्यस्थितीत निर्माण होणा-या कच-याचे 80-90 टक्के  वर्गीकरणही होत आहे , असे असतांनाही शहरात काही ठिकाणी कचरा पडत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत असल्यामुळे  रस्त्यावरील तसेच चौकातील वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणांवर (Garbage Vernalable Points) नेहमी आढळणा-या कच-याबाबतची कारणे शोधून त्यावर कायम स्वरुपी उपाय योजना करन्याबाबत  आज घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांची बैठक बोलावून स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे  त्यांच्या कार्यपध्दतीच्या नियोजनाबाबत आढावा देखील घेण्यात आला.या बैठकी मध्ये सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी  ऑगस्टीन घुटे,मुख्य आरोग्य निरीक्षक  नरेंद्र धोत्रे,  वसंत देगलूरकर व फ, ग आणि ह प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: An important meeting was held on the issue of waste kalyan Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण