आयरे गावातील ५०० पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा, मंदार टावरेंची तहसीलदारांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:39 IST2021-07-27T16:38:48+5:302021-07-27T16:39:25+5:30
Dombivali : अनेकांचे संसार उघड्यावर पडले, त्यामुळे त्यांना शासनाकडून तात्काळ मदतकार्य अपेक्षित असून तेथील नागरीक उपेक्षित राहू नये अशी मागणी टावरे यांनी केली.

आयरे गावातील ५०० पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा, मंदार टावरेंची तहसीलदारांकडे मागणी
डोंबिवली: आयरे गावात यंदाही खाडीचे पाणी घराघरात घुसून ५०० नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. २०१९ मध्येही असं घडलं होतं, मात्र त्यावेळी तातडीनं नागरिकांना तहसीलदार अधिकाऱ्यांनी तत्कालीन युती सरकारच्या आदेशाने अर्थ, अन्नधान्य मदत कार्य पोहोचवले होते, तसेच आताही मिळावे अशी मागणी माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सदस्य मंदार टावरे यांनी तहसीलदार दीपक काकडे यांना सोमवारी केली. त्या ठिकाणी सुमारे ५०० घर पाण्याखाली होती, त्या नागरिकांचे खूप हाल झाले. त्यांचे देखील संसार पाण्याखाली गेले.
अनेकांचे संसार उघड्यावर पडले, त्यामुळे त्यांना शासनाकडून तात्काळ मदतकार्य अपेक्षित असून तेथील नागरीक उपेक्षित राहू नये अशी मागणी टावरे यांनी केली. समता नगर, सहकार नगर, श्रीराम नगर, गणेश प्रसाद चाळ, कोपर पूर्व परिसर, बेडसिंग मैदान आदी परिसरातील रहिवाश्यांचा त्यात समावेश आहे.
तत्कालीन युती सरकारने सुमारे दोन महिने पुरेल एवढा शिधा पूरग्रस्तांना दिला होता, तेवढाच किंबहुना लॉकडाऊन परिस्थिती बघता त्याहून जास्त सहकार्य केले जावे, अशी अपेक्षा टावरे यांनी व्यक्त केली. त्यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून नुकसान झालेल्याना शासकीय निकषानुसार नियमात बसत असल्यास निश्चित सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.