डोंबिवली : केडीएमसी निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेनेच्या युतीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. असे असतानाच सोमवारी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्यावर बेकायदा बांधकामाचा आरोप करत त्यांना आयरे प्रभागातून उमेदवारी दिल्यास आमचा त्याला विरोध असेल. कार्यकर्त्यांनी सांगितले तर पूर्ण पॅनल क्रमांक २९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा इशाराही दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधला संपर्क -बेकायदा बांधकाम केल्याचे जाहीर असून, एफआयआर दाखल झाल्याचे ते म्हणाले. तसेच ६५ बेकायदा इमारतींच्या बांधकामामधील टावरे हे म्होरके असल्याने आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका पाटील यांनी घेतली. पाटील यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात टावरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
Web Summary : Ex-corporator Ravi Patil threatens to contest independently if BJP nominates Mandar Taware, alleging illegal construction. He contacted Shinde about this. Taware declined comment.
Web Summary : पूर्व नगरसेवक रवि पाटिल ने भाजपा द्वारा मंदार टावरे को उम्मीदवार बनाने पर निर्दलीय चुनाव लड़ने की धमकी दी, अवैध निर्माण का आरोप लगाया। उन्होंने शिंदे से संपर्क किया। टावरे ने टिप्पणी करने से इनकार कर दिया।